! शौर्यवाडा - फक्त हॉटेल नव्हे- एक संकल्पना !

संकल्पना

मालक श्री विकास नाना हांडे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेले एक वास्तव म्हणजे शौर्यवाडा.! शौर्यवाडा हे फक्त हॉटेल नसून श्री हांडे यांनी त्यांच्या या संकल्पनेबरोबरच आपल्या गावरान संस्कृतीचे दर्शन व ऐतिहासिक काल तसेच शेतकरी बांधवावरचे प्रेम कसे आपल्या ग्राहकांच्या फक्त निदर्शनासच नव्हे, तर ते प्रत्यक्षात कसे आणता येईल आणि त्यादृष्टीने केलेले वास्तववादि प्रयत्न व त्यासाठी पूर्णतः घेतलेली दक्षता यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शौर्यवाडा.

सविस्तर पाहा...

! शौर्यवाडा - होय खरोखरच गावाकडचा असलेला वाडा !

शौर्यवाड्याच्या आत जसा प्रवेश कराल तसा ,तिथल्या दगडी भिंती ,रथाची बैलगाडी चे चाके , लाकडी खांबावरची सुबक कालाकसुरी, सोबत बैलगाडी ,शेतकरी आणि कौलारुवाडा हा देखावा रात्रीच्या नयनरम्य झगमगाटात जेव्हा बघाल तेव्हा क्षणभर मंत्रमुग्ध झाल्याचा आनंद आपणास नक्कीच लाभेल. शौर्यवाडा तुम्हाला हॉटेल सोबत गावाकडच्या राहणीमानाचा तसेच ऐतिहासिक संस्कृतीचा नजाराच आपणासमोर पेश sadar करताना दिसून येतो.

आमची खासियत आमची चव

आमच्या या शौर्यवाडा ची खासियत ही म्हणजे आमची चव. आमचे स्वतः चे असे बनवलेले अफलातून मसाले ,गावाकडची चूल आणि त्यावर बनवलेलं अस्सल गावरान मांसाहारी जेवण तसेच खास तांब्या-पितळी भांड्याचा वापर अशा काही गोष्टी जे पुण्यासारख्या शहरात आढळणे म्हणजे नवलच…

चला तर पाहू आपल्याकडं मिळणारे रुचकर जेवण...

इथे फोटो किंवा सेल्फी घेण्याची मोह तुम्हाला आवरेल???