मटण रान । बोलायला किती लहानसा शब्द मात्र बनवताना लागणारी मेहनत किती अफाट । तुम्हाला तर माहीतच आहे की मटण शिजताना सर्वात जास्त वेळ जातो ते त्यांच्या मांडी साठी. मग तर तुम्ही विचार करूच शकता रोस्ट करण्यासाठी किती वेळ लागेल ते मात्र आपण मटण रान बनवताना घरगुती मसाले वापरून केलेलं मॅरीनेट आणि अस्सल गावरान तुपाचा रोस्ट करताना केलेला वापर यामुळे घास घेताच विरघळेल अस रुचकर स्वादिष्ट मटण तुम्हाला स्वर्गाची आठवण तर नक्कीच करून देईल
पुण्यातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात एकमेव ठिकाणी मिळणार अख्खा बकरा रोस्ट रान। होय, तुम्ही वरती वाचलंच असेल की आम्ही मटण रान कस बनवतो हे बघितलं अगदी तसच आम्ही पूर्ण बकरा रोस्ट रान देखील बनवतो. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल असं का? ग्रुप मध्ये एकाच ताटत जेवणाची मज्जा तुम्हाला माहीतच असेल आणि तीच मज्जा जर मटनाची असेल तर आणखी काय बोलावं. अशाच खव्वयांच्या ग्रुप साठी ८-१२ किलो मटणाच रान।।
अख्खा मटण बकरा रोस्ट प्रमाणेच अवघ्या महाराष्ट्रात प्रथमच शौर्यवाडा इथे बनवलेलं चिकन रान . तंदुरी चिकन म्हनजे अवघ्या मांसाहारी लोकांसाठी असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न आणि त्यासाठीच आम्ही काहीसं नवीन आणि तंदुरीसाठी एक उत्तम पर्याय शोधण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न मात्र इतका आवडला की अगदी लोकं म्हणतात 'चिकन रान हवं तर शौर्यवाडाचच'
जिथं चूल नाही तो वाडा कसला???बरोबर ना म्हणूनच खास गावकडची चव येण्यासाठी चुलीवर बनवलेलं तांब्या-पितळी भांड्यात बनवलेलं जेवण त्यासोबत चंद्रासारखी गोल गोल भाकरी आणि सोबतच अस्सल इंद्रायणीचा चिकट भात। काय वर्णन ऐकूनच तोंडला पाणि सुटलं ना?कधी येताय मग?